About Us

उद्दिष्टे आणि कार्ये

जाणून घ्या

उद्दिष्टे

माण च्या सर्वांगिण विकासासाठी स्वच्छ, सुंदर व हरित ग्राम तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे दारिद्रय निर्मुलनाचे उपक्रम चालविणे, इंदिरा आवास योजनेअंतर्गत निवारा व निवारा विषयक सुविधा पुरविणे, प्रशिक्षणातून विकास कार्यक्रमांतर्गत लोक प्रतिनिधींचे सक्षमीकरणाद्वारे पंचायती राज व्यवस्था बळकट करणे हे या विभागाचे प्रमुख उद्दीष्ट आहे.

कार्ये

माण ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था असून, गावातील सर्वांगीण विकास, सार्वजनिक सुविधा, आरोग्य, स्वच्छता आणि प्रशासन यांची जबाबदारी सांभाळते. खाली तिची प्रमुख कार्ये दिली आहेत/p>

ग्रामविकास व पायाभूत सुविधा

१. गावातील रस्ते, गटारे, नाले, पूल इत्यादींची बांधणी आणि देखभाल करणे.
२. पिण्याच्या पाण्याची योजना राबविणे व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणे.
३. वीजपुरवठा, रस्त्यांवरील दिवे ( स्ट्रीटलाइट्स), आणि सार्वजनिक ठिकाणांची देखभाल करणे.
४. स्मशानभूमी, सामुदायिक सभागृह, शाळा परिसर, व खेळाचे मैदाने यांचे सुशोभीकरण व देखभाल.

स्वच्छता व आरोग्य

१. घनकचरा व्यवस्थापन, नाले स्वच्छता, व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कार्यवाही.
२. गावातील आरोग्य केंद्रे, बालवाडी, अंगणवाडी यांचे व्यवस्थापन.
३. आरोग्य तपासणी शिबिरे, लसीकरण मोहीम, आणि महिला आरोग्य जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे.

कर आकारणी व महसूल

१. घरपट्टी, व्यावसाय कर, पाणीपट्टी, बाजार कर, जमीन कर इत्यादी कर वसूल करणे.
२. ग्रामपंचायतीच्या निधीचा योग्य वापर करून गावातील प्रकल्पांना आर्थिक सहाय्य पुरवणे.

शेती व पर्यावरण विकास

१. शेतकऱ्यांसाठी सिंचन योजना, शेती शिबिरे, आणि जैविक शेती प्रोत्साहन उपक्रम राबविणे.
२. वृक्षारोपण, जलसंवर्धन, व मृदा संरक्षण उपक्रमांना चालना देणे.
३. पाणलोट विकास कार्यक्रम आणि पर्यावरण संरक्षण यावर भर देणे.

कायदा व सुव्यवस्था

१. स्थानिक पातळीवर शिस्त राखणे, गावसभांचे आयोजन करणे.
२. सामाजिक सौहार्द राखण्यासाठी मतभेद सोडविणे, आणि लोकशाही पद्धतीने निर्णय घेणे.
३. ग्राम सुरक्षा दल व आपत्कालीन प्रतिसाद गट यांच्या माध्यमातून गावातील सुरक्षितता वाढविणे.

प्रशासनिक कार्य

१. ग्रामसभा व ग्रामपंचायत बैठका नियमितपणे घेणे.
२. सरपंच,ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत कार्यकारणी यांच्या मार्फत सर्व योजनांची यशस्वी अमंलबजावणी करणे
३. राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजना जसे की: प्रधानमंत्री आवास योजना, मनरेगा (रोजगार हमी योजना), स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशन, ग्रामसौर योजना यांची अंमलबजावणी.

भविष्यातील विकास दिशा

१. हिंजवडी माण आयटी पार्क व शहरी विस्तारामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येच्या गरजेनुसार विकास आराखडे तयार करणे.
२. सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन,अपारंपारिक उर्जा, स्मार्ट व्हिलेज अंतर्गत इतर कामे करणे.आणि डिजिटल ग्रामपंचायत प्रणाली विकसित करणे.